NCB अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबईत दादरमधील चैत्यभूमीवर हजेरी लावली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वानखेडेंनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजर झाले होते. यावेळी अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकही चैत्यभूमीवर दाखल झाले होते. त्याचवेळी समीर वानखेडेंच्या विरोधात चैत्यभूमीवर घोषणाबाजी करण्यात आली. वानखेडेंच्या मुद्द्यावरुन समर्थक आणि विरोधक एकमेकांच्या समोरा समोर आल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. समीर वानखेडे यांना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही. असं म्हणत भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अनिल दगडू कांबळे यांनी विरोध केला.
Category
🗞
News