Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 10/17/2021
मागील काही दिवसामध्ये पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असून अशीच घटना पुण्यातील मुंढवा परिसरात घडली आहे.मुंढवा सिग्नल चौकात वाहतूक नियमनाचे काम करणार्‍या पोलिसाने एका चारचाकी वाहन चालकाला मागील दंड भरण्यास सांगितला. दंड न भरताच वाहन चालक निघून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसाने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. कार चालकाने संबधीत पोलिसाला बोनेटवरून जवळपास ८०० मीटर अंतर घेऊन जाण्याची घटना घडली आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.या प्रकरणी संबधीत चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Category

🗞
News

Recommended