Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 10/8/2021
धरणाच्या मधोमध अडकले अजित पवार; पाहा VIDEO
पुण्याच्या मावळ तालुक्यातील कासारसाई धरणाच्या (kasarsai-dam)मधोमध पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अडकले होते. तराफ्यावर बसून मत्स्यव्यवसायाची पाहणी करायला ते निघाले होते. तेव्हा तराफ्याचे इंजिन बंद पडले. चालकाने इंजिन सुरू करायचे प्रयत्न केले पण शेवटी लगतची बोट जवळ घेण्यात आली आणि दादा त्यात बसले मग पुढचा प्रवास सुरु झाला. सुरुवातीलाच अजित पवारांनी जास्तीचे लोक तराफ्यात बसवू नका अशी तंबी दिली होती. मात्र तरीही उपस्थितांनी तराफ्यावर गर्दी केली आणि अधिकच्या वजनाने इंजिनवर ताण आला. त्यामुळे इंजिन बंद पडून तराफा मध्येच अडकला होता. (deputy-chief-minister-ajit-pawar-at-pune-kasarsai-dam)
#AjitPawar #Kasarasaidam #Pune #MavalTaluka

Category

🗞
News

Recommended