Lokmat | शिवरायांचा खोटा इतिहास लिहिणारे ‘महाराष्ट्र भूषण’, तर खोटा इतिहास सांगणारे ‘शिवभक्त’

  • 3 years ago
महाराष्ट्रात शिवछत्रपतींच्या नावाचा वापर करून अनेकजण स्वत:ला शिवभक्त समजतात. खोटा इतिहास लिहिणा-यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो, तर शिवरायांचा खोटा इतिहास सांगणा-यांना शिवभक्त म्हणून नावाजले जाते. या गोष्टी मनाला चीड आणणा-या आहेत. शिवरायांच्या अस्मितेचे, त्यांच्या विचारांचे आणि गड-किल्ल्यांचे रक्षण करणा-यांनाच ख-या अर्थाने शिवभक्त म्हणून ओळखले गेले पाहिजे, अशा शब्दांत सद्यस्थितीतल्या राजकीय परिस्थितीवर परखडपणे टीका करतानाच आमदार नितेश राणे यांनी आपण शिवरायांच्या विचारांचे मावळे असून, त्यांची अस्मिता आणि त्यांनी निर्माण केलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगत सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ऐतिहासिक शिवमंदिराच्या संवर्धनास कशाचीही कमी पडू देणार नसल्याची स्पष्ट ग्वाही दिली.अखिल भारतीय शिवछत्रपती जन्मोत्सव समितीच्या वतीने सोमवारी किल्ले सिंधुदुर्गवरील ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिरात आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended