पुरस्कार प्राप्त डीसले गुरुजीना महाराष्ट्र भूषण देऊन सन्मानित करा | Sakal Media |

  • 3 years ago
ज्या पोपटराव पवार यांना घेऊन हिवरे बाजारच्या धर्तीवर आदर्श गावं संकल्पना संपूर्ण राज्यभर तत्कालीन आघाडी सरकारने राबवली त्याचं धर्तीवर युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर प्राईज’ पुरस्कार मिळवणारे गुरुजी रणजितसिंह डीसले यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने 'शिक्षण सुधारणा समिती गटित' करून प्रत्येक वर्षी 1000 शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे.जेणेकरून पालकांचा खाजगी शिक्षण संस्था कडील कल कमी होईल आणि सोबतच सरकारी शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावेल.त्याचं बरोबर हा पुरस्कार मिळवणारे ते हिंदुस्तानातील पहिले शिक्षक ठरले आहेत. भारतातील सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले गेले परंतू ह्याच्या हि पलिकडे जाऊन अश्या माणसांना राज्य सरकारने राज्यातील सर्वोच्च असा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे.गुरुजी डीसले यांना पुरस्कार देऊन आपण फक्त एका व्यक्तीचा सत्कार करणार नसून प्रत्येक खेड्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षकाचा सन्मान करणार आहात.अशी मागणी स्टुडन्ट हेल्पिंग युनिटच्या अध्यक्षा आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.