Sachin Tendulkar | क्रिकेट खेळाला धर्म मानणाऱ्या प्रेमींसाठी खास बातमी | Lokmat Entertainment News

  • 3 years ago
सचिन.... हे नाव घेतले कि, सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर ! क्रिकेट खेळाला धर्म मानणाऱ्या भारतातील लाखो क्रिकेटवीरांसाठी सचिन एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. भारताच्या प्रत्येक गल्ली बोळ्यात आपल्याला असे अनेक महत्वाकांक्षी सचिन दिसून येतील, कि ज्यांनी सचिनला आदर्श ठेवत मैदानात रणशिंग फुंकले आहे. अश्या या सर्व होतकरू तरुणांचे नेतृत्व करणारा सिनेमा लवकरच मराठीच्या मोठ्या पडद्यावर येत आहे. 'मी पण सचिन' असे या सिनेमाचे नाव असून, नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर फर्स्ट लुकसह मुहूर्त करण्यात आला. गणराज असोसिएटसने आतापर्यंत प्रस्तुत आणि निर्मित केलेल्या हिट चित्रपटांच्या यादीत आता लवकरच 'मी पण सचिन' या चित्रपटाचा देखील समावेश होत आहे. विशेष म्हणजे, मराठी रॅपर किंग जेडी उर्फ श्रेयश जाधव यात लेखक आणि दिग्दर्शक अश्या दुहेरी भूमिकेतून लोकांसमोर येत आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended