Lokmat International News | सईद च पाकिस्तानला आव्हान,मला अटक कराच | Lokmat Marathi News Update

  • 3 years ago
कायद्यानं बंदी घातलेल्या जमात उद दावाचा म्होरक्या व मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद यानं तर आता थेट पाकिस्तान सरकारला उघड आव्हानच दिलं आहे. मला अटक करून दाखवाच असा इशारा देत सईदनं काश्मिरी लोकांसाठी सुरू असलेला लढा सुरूच राहील असंही म्हटलं आहे. जर पाकिस्तान सरकारला मला अटक करायची असेल तर त्यांनी यावं नि मला अटक करावी; परंतु २०१८ हे वर्ष मी काश्मिरींसाठी अर्पण केलेलं आहे नि त्यात बदल होणार नाही अशी गर्भित धमकीही त्यानं दिली आहे.जर तुम्ही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलात, तर आम्ही जास्त जोमानं उसळी मारून येऊ असंही सईदनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे हाफिज सईदला जागतिक स्तरा वरील दहशतवादी म्हणून अमेरिकेनं घोषित केलं असूनही सईद उघडपणे पाकिस्तानमध्ये फिरत आहे व भारतविरोधी गरळ ओकत आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended