त्याने केली आपल्याच मुख्याध्यापिकेची गोळी झाडून हत्या | Lokmat Marathi News Update | Lokmat News

  • 3 years ago
हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यातील विवेकानंद शाळेत शिकत असलेल्या शिवांश याला मुख्याध्यापिके नी शाळेतून काढून टाकले होते. त्यामुळे चिडलेल्या शिवांश शनिवारी पालकसभेला वडिलांची बंदुक घेऊन आला आणि मुख्याध्यापिकेवर गोळ्या झाडल्या.गोळ्या लागल्या नंतर मुख्याध्यापिका जागीच कोसळल्या. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मुख्याध्यापिकेवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. एक त्यांच्या चेहऱ्यावर तर खांद्यावर तर एक हाताला लागली. ही घटना शनिवारी सकाळी ११:३० वाजता घडली. गोळी झाडल्यानंतर त्याने तिथून पळ काढला. पण सुरक्षारक्षकाने त्याला पकडले. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended