वंडर बॉय प्रणव धनावडेने सोडलं क्रिकेट! केल्या होत्या १००९ धावा | Latest Cricket Update | Lokmat News

  • 3 years ago
१६ वर्षाखालील क्रिकेट सामन्यात एका खेळीत १००९ धावा करणा-या या खेळाडूने बेकार फॉर्मला वैतागून क्रिकेट खेळणे बंद केले आहे. प्रणवचे वडील एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहेत. प्रणवने जेव्हा ही शानदार खेळी केली होती तेव्हा तो रातोरात क्रिकेटच्या विश्वात स्टार बनला होता. त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याला प्रत्येक महिन्यात १० हजार रूपयांची स्कॉलरशीप देण्याची घोषणा केली होती. पण आता प्रणवने खेळण्यास नकार दिला आहे. प्रणवच्या वडीलांनी असोसिएशनला पत्र लिहून म्हटले आहे की, आता प्रणवला दिली जाणारी स्कॉलरशीप बंद केली जावी. जर तो पुन्हा फॉर्ममध्ये आला तर त्याची स्कॉलरशीप सुरू करावी. तेव्हापर्यंत ही स्कॉलरशीप बंद करावी. 
१००९ रन्सची रेकॉर्डतोड खेळी केल्यानंतर प्रणवची फलंदाजी अचानक बिघड्ली आहे. यानंतर एमसीएने अंडर-१६ टीममधून बाहेर केलंय. नंतर प्रणवने बेंगळुरूमध्ये अंडर-१९ टीमसोबत ट्रेनिंग केलं. पण बेंगळुरूहून परत आल्यावर ही प्रणव फॉर्ममध्ये आला नाही. त्याचे कोच मोबिन शेख यांच्यानुसार, प्रणवचं लक्ष मीडिया कव्हरेजमुळे भरकटलं आहे. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended