उभं राहून जेवताय? सावधान! आरोग्याला आहे घातक.त्वरित बदला सवय | Diet News

  • 3 years ago
मंडळी एक असा काळ होता जेव्हा लोक जमिनीवर बसून जेवायचे, पण हळूहळू हो काळ बदलत गेला. कालांतराने लोक टेबल-खुर्चीवर बसून जेवायला लागले. मग नंतरचा काळ असा काही बदलला की लोक आता उभं राहून जेवतात. पण त्याने आपलं काय नुकसान होतं हे कोणालाच माहीत नसतं.उभं राहून जेवल्याने अपचन, लठ्ठपणा असे आजार उद्भवतात. असं म्हटलं जातं की उभं राहून खाल्ल्याने आपल्या शरीरातील आतड्या आकसल्या जातात आणि त्यामुळे खाल्लेलं पचायला त्रास होतो.उभं राहून जेवताना आपल्या पायात बूट किंवा चप्पल असते ज्यामुळे आपले पाय गरम पडतात. आयुर्वेदा नुसार जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपले पाय थंड असणं महत्त्वाचं आहे. बुफे बसून जेवल्याने आपलं मन शांत आणि एकाग्र राहतं. पण उभं राहून जेवल्याने ती एकाग्रता राहत नाही.उभं राहून जेवताना अनेकदा आपण खूप घाईत जेवतो. त्यामुळे ठसका लागणे, किंवा नाकात घास जाण्यासारखे प्रकार होतात.खरं तर उभं राहून खाल्याने आपल्या शरीराला योग्य ते पोषक घटकही मिळत नाहीत. त्यामुळे नेहमी प्रयत्न करा की तुम्ही जमिनीवर बसून जेवाल. तेच आरोग्यदायी असतं.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended