दलित व्यक्तीचा अधिकार हिरावणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी नेत्याने उभं राहणं हे दुर्देव आहे - मलिक

  • 3 years ago
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे. नाव बदलल्यामुळे 'तो, मी नव्हेच' असं सांगून चालणार नाही, असं ते म्हणाले आहेत. वानखेडेंसोबतच भाजपा नेते किरीट सोमय्या आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे.