Marathwada Rain Update: कन्नड-सिल्लोड मुख्य रस्त्याला जोडणारा पूल वाहून गेला
  • 3 years ago
औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील पिशोरला मंगळवारी पहाटे साधारणपणे तीन वाजता सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील सर्व नद्या-नाल्यांना पूर आला आहे. अंजना नदीला आलेल्या पुरामुळे पळशी खुर्द व पळशी बुद्रुक या गावांना कन्नड-सिल्लोड मुख्य रस्त्याला जोडणारा पूल वाहून गेला. पूल वाहून गेल्याने व पुलावरील पाण्यामुळे या गावांचा मुख्य रस्त्याशी असणारा संपर्क तुटलेला आहे.याच पुरामुळे कोळंबी, भारंबा, तांडा,वाडी, पळशी बुद्रुक या गावांचा पिशोर गावाशी असणारा संपर्क सुद्धा तुटला आहे. (Video - संतोष शिंदे )
#kannad #sillod #aurangabad #aurangabadnews #aurangabadliveupdates #aurangabadnewsupdates #heavyrainfall #rainfall
Recommended