Sonalee Kulkarni and Kunal Benodekar | सोनालीने कुणालसाठी प्लॅन केलं स्पेशल सरप्राईज | Lokmat Filmy

  • 3 years ago
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी काही महिन्यांपूर्वीच प्रियकर कुणाल बेनोडेकरसोबत लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर सोनाली सोशल मिडियावर कुणालसोबतचे अनेक फोटोज शेअर करताना दिसून येते. आता सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या पोस्टमधून ती कुणालला वाढदिवसांनिमित्त सरप्राईज देण्यासाठी कुठेतरी निघाली असल्याचे कळते. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत तिने लिहिलयं की, ‘look who is here and stay tuned for the big surprise mr. Benodkar…’ . तर तिच्या पुढील स्टोरीवरून ती कुणाला मालदिव ट्रिपचे सरप्राईज देणार असल्याचे कळते. एका मुलाखतीत तिने याची माहिती दिली आहे. या मुलाखतीत ती म्हणाली, ‘आम्हाला दोघांनाही ट्रॅव्हेलिंग खूप आवडतं. प्रत्येक वर्षी आम्ही कोणत्यातरी देशात कुणालचा वाढदिवस साजरा करतो. रिलेशनशिपच्या पहिल्या वर्षी आम्ही पोर्तुगलला कुणालचा वाढदिवस साजरा केला होता आणि त्यानंतर मोरिशसला. गेल्यावर्षी कोविडमुळे आम्हाला कुठेही जाता आलं नव्हतं. पण त्यावेळी आम्ही दुबईला होतो तर टेक्निकली आम्ही वाढदिवस साजरा करण्यासाठी एका वेगळ्याच देशात होतो. यावर्षी मात्र मी कुणाला मालदिव ट्रिपने सरप्राईज करतेय. पण कुणाला आम्ही कुठे चाललोय हे अजिबात माहिती नाहीये.” लग्नानंतर कुणालचा हा पहिलाच वाढदिवस असल्याने या ट्रिपची एक्सायटमेंट वाढली असल्याचेही तिने सांगितले आहे.
snehalvo
#SonaleeKulkarni #KunalBenodekar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended