मुंबई(Mumbai) महापालिकेत एकानं खोट्या कागदपत्रांच्या आधारे 28 वर्षे नोकरी केलीय. रमेश शेलार(Ramesh Shelar) असं तोतयाचं नाव आहे. 1993 ला तो माळी म्हणून कार्यावर रुजू झाला होता. यावेळी त्याने बीएमसीतच(BMC) शिपाई असलेल्या सोपान साबळे(Sopan Sable) यांचे खोटे कागदपत्र जमा केले. 2017 साली जातप्रमाणपत्र तपासताना दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रात साम्य जाणवलं. त्यामुळे शेलारकडे पुन्हा कागदपत्रांची मागणी करण्यात आली. तेव्हापासून हा तोतया कर्मचारी कामावर आलाच नाही. याप्रकरणी शेलार मुंबईला(Mumbai) आल्याची माहिती मिळताच काल पोलिसांनी त्याला अटक केलीय. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
#BMC #mumbai #mumbaibmc #mumbainews #mumbaiupdates #mumbailiveupdates
#BMC #mumbai #mumbaibmc #mumbainews #mumbaiupdates #mumbailiveupdates
Category
🗞
News