युरोच्या मैदानात डॅनिश ताफ्याने दिमाखात प्ले ऑफ गाठली. त्यांचा हा प्रवास लक्षवेधी असाच आहे. सलामीच्या सामन्यात स्टार Christian Eriksen मैदानात कोसळला आणि संघातील त्याच्या सहकाऱ्याच्या मनावर एक आघातच बसला. यातून ते सावरणार का? असा प्रश्न सगळ्याच फुटबॉल प्रेमींना पडला होता. खूपच अवघड वाटणारी गोष्ट जिद्द आणि कठोर मेहनीच्या जोरावर शक्य असते, हेच Denmark च्या संघाने दाखवून दिले.
Category
🥇
Sports