सी. डी. देशमुख यांच्या कार्य-कर्तृत्वाला उजाळा

  • 3 years ago
भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर, माजी केंद्रीय अर्थमंत्री, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ आणि कुशल प्रशासक ते संस्कृत पंडित, वनस्पतीशास्त्रज्ञ अशा अनेक आघाड्यांवर चिंतामणराव द्वारकानाथ ऊर्फ सी. डी. देशमुख आपल्या बुद्धिकौशल्याने आणि विशुद्ध परखडपणाने तळपले. या प्रकांडपंडित पुरुषोत्तमाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीचे औचित्य साधत त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘महाराष्ट्राचा चिंतामणी’ हा खास विशेषांक योजला. मान्यवर तज्ज्ञांचे दर्जेदार लेखन असलेल्या या संग्राह्य विशेषांकाचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ, रिझर्व्ह बँकेचे माजी कार्यकारी संचालक डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

#CDDeshmukh #BookLaunch #लोकसत्ता #महाराष्ट्राचाचिंतामणी