वीजबिलात सवलत द्या अन्यथा सरकारला चटका देऊ- आ. अँड आकाश फुंडकर|SAKAL| KHAMGAON|

  • 3 years ago
राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने वीजबिलात सवलत द्या अन्यथा जनतेद्वारे सरकारला जोराचा चटका देऊन त्यांना कट करू, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांनी केले. आज सोमवार दि. २३ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून जन आक्रोश आंदोलन केले त्यावेळी ते बोलत होते.
लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले आली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जामत्र्यांनीच स्वतः वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजपा वीजबिलांच्या होळीचे आंदोलन केले.
लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प होऊन नागरिकांना फार मोठा आर्थिक ताण सहन करावा लागला. अशा परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने इतर राज्यांप्रमाणे हातावर पोट असणारे श्रमिक, रस्त्यावरील व्यावसायिक, बारा बलुतेदार, शेतकरी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक इत्यादींना स्वतःहून पॅकेज द्यायला हवे होते. या सरकारने अजूनही जनतेला पॅकेज दिलेले नाही. उलट वीज कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे भरमसाठ वीजबिले दिली. हजारो शेतकऱ्यांनी वर्षभरापासून पैसे भरूनही अद्यापही वीज कनेक्शन दिले नाहीत. दोन दोन महिने जळलेल्या डीपी साठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागत आहे. त्याबाबत रास्त सवलत देण्यासही सरकार तयार नाही. त्यामुळे भाजपाने या प्रश्नावर जनहितासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी व इतर वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत दिली नाही तर जिल्हा भरात आणखी तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अँड आकाशदादा फुंडकर यांनी दिला . यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश सह संयोजक सगरदादा फुंडकर यांचेसह भाजप नेते रामचंद्र पाटील, नगराध्यक्ष सौ अनिताताई डवरे, जिल्हा सचिव संजय शिनगारे, शरदचंद्र

Recommended