कोल्हापूर : नव्या कृषी विधेयकांची बिंदू चौकात होळी | Sakal Media |

  • 3 years ago
केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या तीन शेतकी विधेयकांचा विरोध देशातील सर्व किसान संघटना सध्या करत आहेत. कोल्हापूरातील बिंदू चौकामध्ये सर्व डाव्या संघटना, समन्वय समित्यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र नव्या कायद्यांची होळी केली. कोल्हापूर शहरातील आंदोलन बरोबरच वडगाव,शिरोळ गारगोटी, शाहुवाडी, पन्हाळा यासह इतरही तालुक्यात आंदोलन करण्यात आले. देशभर 28 सप्टेंबर या भगतसिंग जयंतीदिनी भाजप सरकारला सळो की पळो करून सोडण्यासाठी व्यापक जनजागृती मोहिमेत सुरुवात होणार आहे
शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, शेती विधेयके हाणून पाडा, शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या भांडवलदारांचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला