Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/28/2021
राजुरा (जि. चंद्रपूर) : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्र पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शैक्षणिक सत्र विद्यार्थ्यांविना सुरू होणार असले तरी ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न आहेत. हे निश्‍चितच स्वागतार्ह आहे. मात्र, ग्रामीण भागांमध्ये ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा आहेत. जवळपास 50 टक्‍के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन नाहीत. अशा परिस्थितीत त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे आवाहन आहे. ऑनलाइन शिक्षण ही तात्पुरती व्यवस्था होऊ शकते, कारण त्या दृष्टीने इन्फ्रास्टक्‍चर अजून विकसित झालेले नाही. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य कच्चे राहण्याची शक्‍यता आहे, असे मत माजी प्राचार्य दौलतराव भोंगळे यांनी व्यक्त केले.

#Education #School #Opening #Online #Chandrapur #Vidarbha #SakalNews #MarathiNews #ESakalNews #Viral

Category

🗞
News

Recommended