राजू शेट्टी यांनी आमदारकी नाकरली; यावर कार्यकर्ते म्हणाले...

  • 3 years ago
सोलापूर : स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ’एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच’, असं म्हणत महाविकास आघाडीकडून देण्यात येणारी आमदारकी नाकरली आहे. मात्र, यावर कार्यकर्त्यांकडून त्यांनी किमान शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आमदार की घ्यावी, अशी विनवणी केली जाऊ लागली आहे. विधानपरिषदेवर राज्यपालांच्या कोट्यातून १२ जागा सरकारमार्फत शिफारस करुन पाठवायच्या आहेत. त्यापैकी एका जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसनेनी स्थापन केलेल्या आघाडीच्या नेत्यांकडून आला होता. राष्ट्रवादीच्या कोट्यातून शेट्टी यांना उमेदवारी देण्यात येणार होती. त्यावर राजू शेट्टी यांनी होकार दर्शवला होता. मात्र त्यानंतर काहीजणांकडून संतप्त प्रतिक्रीया उमटू लागल्या होत्या. त्यावर शेट्टी यांनी उमेदवारी नाकरण्याचा निर्णय घेतला. त्यावरही कार्यकर्ते नाराज झाले असून शेट्टी यांनी उमेदवारी स्विकारुन शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी काम करावे असे म्हटलं आहे. तर काही कार्यकर्त्यांनी आपण शेतकरी संघटनेबरोबर असल्याचे सांगत समाजमाध्यमांमध्ये प्रतिक्रीया दिल्या आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी www.esakal.com वर क्लिक करा

#treding #sakalmedia #vural #politics #marathinews