जळगाव : संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने चार भिंतीत बंद आहे. वेळ कसा घालवावा या विवंचनेत असताना शेतकरी वर्ग मात्र आजही कोरोनाला दोन हात करून अन्न पिकविण्यासाठी राबत आहे. निसर्गाच्या अवकृपेचे वेळोवेळी चटके सहन करणारा बळीराजा कोरोना संक्रमणावर मात करण्यासाठी सध्या दिवस उजाडताच आपआपल्या शेतात जाऊन मशागतीचे कामे आटपून घेत आहे.