महिलांच्या आत्मसन्मानासाठी आणि वाढत्या स्त्रीभ्रूणहत्यांचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या "महिला आत्मसन्मान रॅली'तून सोलापूरकरांनी स्त्रीभ्रूणहत्येविरोधी लढ्याचा "एल्गार' केला. यात तब्बल एकवीस हजार सोलापूरकरांनी उपस्थिती दर्शवून स्त्रीभ्रूणहत्या तातडीने थांबायला हव्यात, असा संदेश समाजाला दिला. युवकांच्या मोठ्या प्रमाणावरील लक्षवेधी हजेरीने ही रॅली अधिकच "यूथफुल्ल' झाली होती.
Category
🗞
News