Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/28/2021
'राष्ट्रकुल'च्या कुरुक्षेत्रात कापला 'एकलव्या'चा अंगठा
अमरावती - देशातील धनुर्धरांच्या क्रमवारीत तिसरी असलेल्या वृषाली गोरले या आतंरराष्ट्रीय किर्तीच्या व उगवत्या ताऱ्याला राष्ट्रकुल स्पर्धेच्या शिबिरादरम्यान धनुष्यबाण तुटल्यानंतर तो वेळेवर उपलब्ध न करून देण्यात आल्याने तिला दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेला मुकावे लागणार आहे. सध्या भ्रष्टाचाराने गाजत असलेल्या राष्ट्रकुलच्या या "कुरूक्षेत्रा'त खेळाडूंच्या सोयी-सवलतींकडे कशा पद्धतीने दुर्लक्ष केल्या जात आहे याचा हा उत्तम नमुना असल्याचे बोलल्या जात आहे.

Category

🗞
News

Recommended