पुणे - मराठीचा जयघोष, रांगोळ्यांच्या पायघड्या, रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांचा उत्साह आणि फुलांनी सजविलेली ग्रंथदिंडीने पुण्यात आज (गुरुवार) ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बिगुल वाजले. गुरवारी दुपारी साडेचार वाजता हिराबाग टाऊन हॉल येथून प्रारंभ झालेली ग्रंथदिंडी बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि टिळक रस्तामार्गे स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सांगता झाली.
Category
🗞
News