'धनंजय माने इथंच राहतात' हे नवं नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

  • 3 years ago
मराठी चित्रपटांमधील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये देखील लक्ष्मीकांत बेर्डेंनी काम केले. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे अनेक चित्रपट लोक आज ही बघतात. त्यांची पत्नी प्रिया बेर्डे या देखील अभिनेत्री आहेत. मराठी चित्रपट आणि मालिकामध्ये त्या काम करतात. प्रिया बेर्डे आणि त्यांची मुलगी स्वानंदी यांचे 'धनंजय माने इथंच राहतात' हे नवं नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग पुण्यात 19 मार्चला बालगंधर्व रंगमंदिर येथे झाला .