फाटक्या जीन्सचा ट्रेंड आला तरी कुठून? जाणून घ्या रंजक इतिहास

  • 3 years ago
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी काही दिवसांपूर्वी महिलांच्या कपड्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच वाद पेटलाय. अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे रिप्ड जीन्स म्हणजे फाटलेल्या जीन्समधील फोटो शेअर करत तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकारानंतर सोशल मीडियावर फाटलेली जीन्स म्हणजे काय? किंवा या जीन्सचा शोध कसा लागला? ती कशी तयार करण्यात येते? असे बरेचसे विषय नेटकऱ्यांनी सर्च केले आहेत. फाटक्या जीन्सची सध्या तरुणाईमध्ये विशेष क्रेझ असून जीन्सच्या या प्रकाराला तरुण-तरुणींकडून चांगली पसंती मिळतेय. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांच्या वॉर्डरोबमध्ये ही जीन्स पाहायला मिळतेच. त्यामुळेच फाटकी जीन्स म्हणजे नेमकं काय हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात.

Recommended