केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांची पत्नी कांचन गडकरी या दोघांनीही नागपुरातील एम्स येथे कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. तसेच ही वॅक्सीन सुरक्षित असून लोकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. दरम्यान, नागपुरात खासगी रुग्णालयामध्येही कोरोनाचे लसीकरण करण्यात येत असून त्यासाठी नोंदणी करणे सुरू आहे.
Category
🗞
News