नमस्कार, जामखेड टाईम्सच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत
पाहुयात या क्षणाची सर्वात मोठी बातमी
खळबळजनक; बिबट्याने केला जामखेड तालुक्यात प्रवेश
जामखेड तालुक्यातील नायगावमध्ये बिबट्याचे वास्तव्य
बिबट्याच्या हल्ल्यात रेडकू ठार; वनविभागाने दिला दुजोरा
जामखेड तालुक्यात बिबट्या आढळून आल्याने तालुका हादरला.
नायगाव परिसरातील गावांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
जामखेड तालुक्याला हादरवून टाकणारी एक मोठी घटना मंगळवारी उजेडात आली आहे. जामखेड तालुक्यातील नायगावमध्ये बिबट्या आढळून आल्याचे समोर आले आहे. जामखेड तालुक्यात प्रथम बिबट्याचे वास्तव्य आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बिबट्याने नायगाव येथील कोळीवस्ती येथील एका रेडक्यावर हल्ला करत त्याला ठार केले आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. मंगळवारी रेडकू मृतावस्थेत आढळून आल्यानंतर नागरिकांनी याची माहिती जामखेड वनविभागाच्या अधिकार्यांचा कळवली. मंगळवारी वनविभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. बारकाईने केलेल्या पाहणीत पथकाला घटनास्थळी काही ठसे आढळून आले. यावेळी पंचनामा करण्यात आला.यावेळी आढळून आलेल्या ठश्यांवरून हे ठसे बिबट्याचेच असल्याचे वनाधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
बिबट्याचे नायगाव भागात वास्तव्य असल्याचे समोर येताच तालुका हादरून गेला आहे. तर नायगाव परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याने या भागातील शेळ्यांवर हल्ले केल्याचेही समोर आले आहे.बिबट्याला पकडण्यासाठी बुधवारी नायगाव भागात पिंजरा लावला जाणार आहे.
याबाबत जामखेड टाईम्सशी बोलताना जामखेडचे वनपाल अनिल खराडे काय म्हणालेत ऐकुयात.
Be the first to comment