जळगाव - प्रेमच आहे संस्कृतीचा सारांश आणि अभ्युदयाची आशा एकमेव प्रेमाच्या चुकीच्या कल्पना आणि वस्तू म्हणून स्त्रीकडे पाहाण्याची मानसिकता यामुळे राज्यात भयंकर घटना घडत आहेत ‘दिव्य मराठी’ने ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने आरंभलेल्या या अभियानाला राज्यभर उदंड प्रतिसाद मिळाला दोन दिवसांत हजारो तरुण-तरुणींनी प्रतिज्ञा करत प्रेमाचा नवा अर्थ जगाला सांगितला या पार्श्वभूमीवर जळगाव येथील सेंट टेरेसा कॉन्व्हेंट स्कूल मधील 2600 विद्यार्थ्यांनी मी फुलराणी जाळणार नाही अशी शपथ घेतली
Be the first to comment