कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार सभा, समारंभ, उत्सव, जत्रा, यात्रा, अगदी लग्न समारंभ साजरे करू नयेत असे शासनाने अवाहन केले होते मात्र, छगन भूजबळ यांनी सरकारच्या अवाहनाकडे दुर्लक्ष करत हडपसर पुणे येथील न्यु इग्लिश मेडिअम स्कुलच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभास हजेरी लावली त्यामुळे कोरोनाच्या प्रतिबंध करण्यासाठी मंत्री महोदयच गंभीर नसल्याचे निदर्शनास आले आहे या कार्यक्रमासाठी सुमारे दीड हजार लोकांनी गर्दी केली होती
Be the first to comment