पुणे - बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लब या आलिशान इमारतीचा डोम आगीच्या विळख्यात सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास पॅनकार्ड क्लब डोमला आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आलेकाही न्यायालयीन वाद सुरु असल्याने क्लब सध्या बंद आहे आगीने अल्पावधीतच संपूर्ण डोम गिळंकृत केल्याने आगीचे रूप गंभीर झाले आहे अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही
Be the first to comment