रंगभूमी.com

@myrangabhoomi
रंगभूमीशी निगडित ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी या Online रंगमंचावर तुमचं स्वागत आहे. हजारो लाखो कलाकार आणि तितकेच रसिक प्रेक्षक मिळून रंगभूमीचा विकास होतो. म्हणूनच, रंगभूमीशी संबंधित बातम्या, येणारी नवीन नाटके, त्यांची समिक्षणे तसंच कलाकारांशी मारलेल्या गप्पा हे सगळं तमाम रसिक प्रेक्षकांपर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न म्हणजे रंगभूमी.com. कट्टर नाट्यप्रेमींसाठी तर ही मेजवानीच आहे. पण, आमचा प्रयत्न जास्तीत जास्त वाचकांमध्ये नाटकाची रुची निर्माण करण्याचाच असेल. रंगभूमीचे संस्कार येणाऱ्या पिढ्यांवर होणे खूप महत्वाचे आहे असं आम्हाला वाटतं. प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेली काही ऐतिहासिक नाटके, नाटकांचे प्रकार आणि नाटकांमधील कलाकारांनी त्यांच्या सशक्त अभिनयाच्या जोरावर उभा केलेला इतिहास!