महाड इमारत दुर्घटनेला जबाबदार कोण ? Raigad Mahad Building collapsed | Maharashtra News

  • 3 years ago
रायगड जिल्ह्यातील महाड शहरात तारीक पॅलेस ही पाच मजली निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. तारीक पॅलेस इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 लोकांवरती महाड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण दबले असल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या इमारत दुर्घटनेप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरसह तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, नगरपालिका इंजिनिअर आणि Rcc कन्सल्टन्स अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिल्डर फारूक काझी याच्यासह आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे , वास्तुविशारद गौरव शहा, तत्कालीन मुख्याधिकारी दीपक जिंदाड , अभियंता शशिकांत दिघे यांच्याविरोधात गुन्हा झाला आहे. साधारणपणे पाच वर्षांपूर्वी या इमारतीचं बांधकाम झालं होतं अशी माहिती आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही इमारत हेलकावे खात असल्याची तक्रार रहिवाशांनी विकासकाकडे केली होती. मात्र, या तक्रारींकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे समजत आहे. इमारतीमध्ये 45 फ्लॅट होते. ज्यापैकी 18 फ्लॅट रिकामे होते. इमारतीच्या ए विंग मध्ये 30 जण दुर्घटनेची चाहूल लागताच इमारतीतून बाहेर पडले. ढिगारा उपसण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. अद्याप चार रहिवाशांच्या मृतदेहांचा शोध सुरू आहे .महाड इमारत कोसळन्यामागच कारण काय?कोण जबाबदार?किती कुटुंब वाऱ्यावर सोडले, त्यांचं यापुढे काय होणार?

lokmat #RaigadMahad #collapsed #Building
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended