मुंबई : राज्यात येत्या 15 जानेवारी रोजी 29 महानगरपालिकांमध्ये मतदान (Mumbai Corporation Election 2026) होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातच निवडणूक प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य आणि अमित ठाकरेही तितक्याच जोमानं प्रचार करताना दिसत आहेत. सत्ताधाऱ्यांकडून प्रचार सुरू आहे. तर मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यानं विविध शहरात प्रचार वाढला आहे. मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार केला जात आहे. तसेच विविध शहरात कार्यकर्त्यांच्या पदयात्रा, कॉर्नर सभा होत आहेत. त्यामुळं आजचा दिवस प्रचाराचा ‘सुपर संडे’ ठरला आहे. तर मुंबईत पहील्यांदातच मतदान करणाऱ्या तरूणांची मुंबई महापालिकेत सत्तेत बसणाऱ्या राजकीय नेत्यांकडून काय अपेक्षा आहे, याबाबत कॉलेजच्या मुलींनी 'ईटीव्ही भारतला' प्रतिक्रिया दिली आहे.
Be the first to comment