बीड : बीडच्या तांदळा (Tandala Village) गावातील 154 शेतकऱ्यांच्या लढ्याला तब्बल दहा वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर यश आलं आहे. न्यायालयाने मावेजा देण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मावेजापोटी तब्बल 100 कोटी रुपये मिळणार आहेत. यामुळं शेतकऱ्यांनी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग क्र. 222 बनवताना शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून मोबदला न देता हा महामार्ग बनवला होता. यामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना अनेक वर्ष संघर्ष करावा लागला. यात 36 जणांचा पाठपुरावा करताना मृत्यू झाला. शासनाने आता तरी विलंब न लावता मावेजा (मोबदला) द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाने अतिक्रमण केलेल्या जमिनीचा 63 वर्षाचा लढा पूर्ण होऊन त्याला यश आलं आहे. शासकीय कार्यालयाच्या शेकडो चक्रा, न्यायालयातील लढा, शासन दरबारी पाठपुरावा यातून आता यश मिळाल्यानं शेतकऱ्यांना आनंदाश्रू अनावर झाले.
Be the first to comment