गोष्ट मुंबईची: भाग ११७ | शूर्पारक - अडीच हजार वर्षांपूर्वीचे मुंबईतील बंदर!

  • last year
तत्कालीन शूर्पारक (सोपारा) बंदरामुळे मुंबईमध्ये समृद्धीचा ओघ सुरू झाला. त्या समृद्धीचे पुरावे नालासोपारा परिसरात फिरताना अनेक ठिकाणी विखुरलेले पाहायला मिळतात. या सर्व पुरात्त्वीय पुराव्यांना जोड मिळते, ती वाङ् मयीन पुराव्यांची. हे वाङ् मयीन पुरावे हिंदू, बौद्ध आणि जैन सर्वच धार्मिक साहित्यात आढळतात. हे पुरावे नालासोपाऱ्याचे प्राचीनत्त्व सिद्ध करण्यासाठी आपल्याला मदत करतात.

Recommended