Vidhan Parishad : फोडाफोडीच्या भीतीनं तिन्ही पक्षांचे आमदार हॉटेल मुक्कामी, आपआपल्या आमदारांची बैठक घेणार

  • 2 years ago
राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांनी कंबर कसलीय. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत आणि दगाफटका टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी आपआपल्या आमदारांना हॉटेलवर मुक्कामाला ठेवण्याचा निर्णय घेतलाय. शिवसेनेचे आमदार मुंबईतल्या हॉटेल वेस्ट इनमध्ये दाखल झालेत. तिथं रात्री शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, अनिल परब, अनिल देसाई यांनी आमदारांची भेट घेतली. राष्ट्रवादी आणि भाजपचे आमदार आजपासून हॉटेलमध्ये मुक्कामाला असतील. भाजपच्या आमदारांना हॉटेल ताजमध्ये ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, आज सर्वच पक्षांच्या बैठका होणार आहेत. तर संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही बैठक होणार आहे.

Recommended