पुण्यात भाजपाच्या महिला आघाडीकडून पुण्यातील लाल बत्ती भागातील महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूण्या म्हणून अमृता फडणवीस आल्या होत्या. यावेळी त्यांनी या महिलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यास सांगितलं. तसेच वाईट परिस्थितीमुळे तुम्ही या व्यवसायात पडला असाल, पण तुम्ही समाजाचा एक अविभाज्य घटक आहात. भविष्यात काही वाईट प्रसंग आला तर भाजपा तुमच्या पाठीशी आहे, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
Be the first to comment