वटपौर्णिमेला स्त्रियांचे अधिक महत्व असते. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी व्रत करायचे असते. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आपल्या समाजात मागच्या काही काळापासून रुढ आहे. यंदा १४ जून रोजी वटपौर्णिमा आहे. या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो. पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसांचे व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करुन वडाच्या झाडाची पूजा करतात. पण पहिल्यांदाच वटसावित्री व्रत करणाऱ्या महिलांनी नक्की काय ऐकायचे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
Be the first to comment