Over 50% Express Trains Ran Late | एक्सप्रेस ट्रेनचा लेटलतीफ कारभार! | Sakal
  • 2 years ago
भारतातल्या निम्म्या मेल/ एस्क्प्रेस गाड्या उशिराने धावल्या असल्याचं कॅगच्या अहवालात समोर आलंय. या अहवालावर नुकतीच संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच राज्यसभेत चर्चा झालीय. कॅगने त्यासाठी २०१६-२०१७, २०१७-२०१८ आणि २०१८-२०१९ अशा तीन वर्षांतील गाड्यांचं वेळापत्रक अन त्यांनतर प्रत्यक्षात त्या गाड्यांची वाहतुकीची प्रत्यक्षातील वेळ तपासलीय.या तीन वर्षांत भारतीय रेल्वेच्या १३ लाख १५४५६ मेल/ एक्स्प्रेस गाड्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यात केवळ २९. ६४ टक्के एक्स्प्रेस गाड्या वेळेवर पोहचल्यात. केवळ २० टक्के गाड्या आपल्या निर्धारित वेळेपूर्वी आल्यात. उर्वरित गाड्यांचे वेळापत्रक केवळ शोभेपुरतेच ठरल्याचं या अहवालातून समोर आलंय.

#Sakal #ExpressTrain #ExpressTraininIndia #IndianRailway #Pune #Mumbai #PuneMumbaiTrain
Recommended