Success Password With Sandip Kale | Jay Mijgar | Sakal Media |

  • 2 years ago
जय मिजगर यांच्यासोबत संदीप काळे यांचा सक्सेस पासवर्ड शो.
मराठवाड्यातले जय मिजगर, पर्यटन विकास आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रात राज्यातलं अग्रेसर असणारे नाव. पाच हजारपेक्षा अधिक युवकांना रोजगार देऊन त्यांना सामाजिक प्रवाहात आणणारा आवलिया. गोरेगाव फिल्मीसिटीमध्ये खूप मोठे काम जय मिजगर यांनी सुरू केले आहे. राज्यात अनेक भागात पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी जय मिजगर यांनी घेतलेला पुढाकार नोंद घेण्यासारखा आहे. एखादा चित्रपट काढतांना तो विषय सामाजिक संदेश देणारा असावाच या भावनेतून जय मिजगर यांनी चित्रपटाच्या अनेक कलाकृती निर्माण केल्या. जय मिजगर हे शेतकरी पुत्र. आपल्या गावाकडे असणारी आपुलकीची संस्कृती अजूनही जय विसरलेले नाहीत. कोरोनाच्या काळात आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना अनेक राज्यांमध्ये त्यांच्या गावापर्यंत नेऊन सोडणे असेल. आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये असलेल्या अनेकांना रोजगाराच्या निमित्ताने मुंबईत आणणे असेल. त्या सगळ्या गोष्टी अगदी आवडीने आणि माझं कर्तव्य आहे असं म्हणून करणारे जय मिजगर आज तरुणाईच्या गळ्यातले ताईत आहेत. आज सकाळचे संपादक संदीप काळे यांच्या सोबत ‘सक्सेस पासवर्ड’ या खास कार्यक्रमांमध्ये जय मिजगर सहभागी झालेले आहेत.
जय मिजगर यांचा सगळा प्रवास राज्यात इतिहासाच्या सोनेरी पानवर कोरला जाईल. महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक युवकाला आपण ‘जय मिजगर’ झालं पाहिजे आणि लोकांचे आशीर्वाद घेतले पाहिजे हे वाटणे गरजेचे आहे. जय मिजगर यांचा थक्क करणारा प्रवास आपण ‘सक्सेस पासवर्ड’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता अनुभवणार आहोत.
चला तर मग सहभागी होऊया सक्सेस पासवर्ड विथ सकाळचे संपादक संदीप काळे यांच्या सोबत.

Recommended