Pune Metro: शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मार्गांपैकी एका टनेलचे काम पूर्ण

  • 2 years ago
शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मार्गांपैकी एका बाजूच्या टनेलचे काम पूर्ण
पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा मार्ग भुयारी आहे
या मार्गिकेची लांबी ६ किमी असून त्यामध्ये शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट हि पाच भूमिगत स्थानके आहेत
कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या भुयारी मार्गाची लांबी ६ किमी असुन जाण्यासाठी व येण्यासाठी असे दोन टनेल बांधण्यात येत आहे.
या दोन टनेल पैकी एका बाजूचे टनेल खोदण्याचे काम आज पुर्ण झाले आहे.
आज स्वारगेट वरून निघालेले पवना नावाचे टनेल बोरींग मशीन बुधवार पेठ येथील भूमिगत स्थानकात पोहोचले आणि ब्रेक थ्रू साधला गेला
आजमितीस स्वारगेट स्थानकाचे ४५ टक्के, मंडई स्थानकाचे २० टक्के बुधवार पेठ स्थानकाचे ४० टक्के , सिव्हिल कोर्ट स्थानकाचे ७५ टक्के आणि शिवाजीनगर स्थानकाचे ७० टक्के काम पुर्ण झाले आहे
भुयारी टनेल मध्ये मेट्रोसाठी आवश्यक असणाऱ्या विद्युत वाहक ताराची कामे सुरु झाले आहेत
सिग्नलिंग आणि कम्युनिकेशन संबंधित कामे देखील सुरु आहेत.
#shivajinagar #shivajinagarnews #shivajinagartunnel #tunnel #punemetro #punemetrotunnel