पाकिस्तानी महिलेची अटारी बॉर्डरवर प्रसूती; भारत-पाक सीमेवर बाळ जन्मल्यामुळे ठेवलं 'बॉर्डर' असं नाव

  • 3 years ago
२ डिसेंबर २०२१ रोजी भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर एका पाकिस्तानी महिलेनं बाळाला जन्म दिला. बाळाचा जन्म भारत-पाक सीमेवर झाल्यामुळे आई-वडिलांनी त्याचं नाव 'बॉर्डर' असं ठेवलं आहे. निंबूबाई आणि बालम राम हे पाकिस्तानी जोडपं गेल्या ७१ दिवसांपासून इतर ९७ पाकिस्तानी नागरिकांसह अटारी सीमेवर अडकून पडले आहे. निंबूबाई गरोदर होत्या आणि २ डिसेंबरला त्यांची पंजाबमधील अटारी बॉर्डर येथे प्रसूती झाली. लॉकडाऊनपूर्वी आपल्या नातेवाईकांना भेटण्याव्यतिरिक्त तीर्थयात्रेसाठी ते भारतात आले होते. पाकिस्तानात परत जाण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना परत घरी जाता येत नाहीये, अशी माहिती बालम राम यांनी दिली.

#AttariWagahBorder #Punjab #Pakistani #Couple #Border