Satara: शरद पवारांचा रामराजेंना फोन अन् अध्यक्षपदाची माळ पाटलांच्या गळ्यात

  • 3 years ago
#satara #sataranews #ramraje #sharadpawar #shivendrarajebhosale #ajitpawar
सातारा : जिल्हा बँक निवडणुकीत (Satara District Bank Election) अध्यक्ष निवडीवरून रस्सीखेच सुरु होती. जिल्हा बँकेमध्ये सध्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांच्याकडे संख्याबळ असल्याने त्यांनी अध्यक्षपदावर दावा केला होता. यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट देखील घेतली होती. त्यामुळं या निवडीकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं. सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील (Nitin Patil), तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार यांनीच नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं समजतंय.

Recommended