संसदीय कामकाजात या सरकारला रस नाही; फडणवीसांनी व्यक्त केला संताप

  • 3 years ago
हिवाळी अधिवेशनाच्या संदर्भात कामकाज सल्लागार समिती बैठकीनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. या २ वर्षात 'अ' तारांकित प्रश्नांना सुद्धा या सरकारने उत्तरं दिली नसल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. यावरून त्यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली. तसेच या बैठकीबाबत त्यांनी निराशा व्यक्त केली आहे. संसदीय कामकाजात या सरकारला रस नाही हे या बैठकीतून स्पष्ट झालं असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.