शहिद बिलाल अहमद माग्रे यांच्या आईला शौर्य पुरस्कार स्वीकारताना अश्रू अनावर

  • 3 years ago
देशाचे रक्षण करताना उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सैन्य दलातील जवानांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. जम्मू-काश्मीर पोलीस बिलाल अहमद माग्रे यांना २० ऑगस्ट २०१९ रोजी दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. देशासाठी दिलेल्या बलिदानासाठी त्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून शहिद बिलाल अहमद माग्रे यांच्या आईने हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार स्वीकारताना त्यांना अश्रू अनावर झाले.

Recommended