भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान वीरचक्र पुरस्काराने सन्मानित

  • 3 years ago
भारतीय हवाई दलातील अधिकारी अभिनंदन वर्धमान यांना संरक्षण दलामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. २०१९ साली भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लाडऊ विमानांना पळवून लावताना अभिनंदन यांचे विमान पाकिस्तानात कोसळले होते. त्यांनी दाखवलेल्या या शौर्यासाठी त्यांचा ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अभिनंदन यांना वीरचक्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे आता ग्रुप कॅप्टन आहेत.