'महाराष्ट्र बंद'ला राज्यात ठिकठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पाठिंबा

  • 3 years ago
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून या बंदला पाठिंबा मिळत आहे. राज्यभवनावर काँग्रेस नेत्यांनी मौनव्रत आंदोलन करून महाराष्ट्र बंदला पाठिंबा दर्शविला. तर भुसावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.