मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजित पवारांचे आश्वासन

  • 3 years ago
शनिवार ९ ऑक्टोंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला. शहरातील उपविभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा अजित पवार यांनी आढावा घेतला असून यासंदर्भात चर्चा करण्यात आली. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कोणतेही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. तसेच लवकरच सर्व शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.