Nilanga: शेतकऱ्यांना सरसकट मदत करा

  • 3 years ago
निलंगा (जि. लातूर) : धनेगाव (ता. केज) येथील मांजरा प्रकल्पाचे दरवाजे उघण्यात आल्याने मांजरा नदीपात्राच्या बाहेर पाणी पडले असून नदीला मोठा पूर आला आहे. शासनाने पंचनामे करण्यासाठी वेळ न दवडता सरसकट हेक्टरी पन्नास हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी व रब्बी हंगामासाठी तत्काळ पॕकेज द्यावे अशी मागणी नदीकाठच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून होत आहे.
दोन दिवासापासून पाण्याचा प्रवाह वाढत असून मांजरा प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्यात आले असले तरी पाणी हळूहळू वाढू लागले आहे. या पुरामुळे नदीकाठच्या शेतातील सोयाबीन, तूर, ऊस, या पीकाचे नुकसान झाले असून पीके. पाण्यात वाहून गेली आहेत. या पाण्याचा फटका निलंगा तालुक्यातील 30 गावाना बसला आहे. त्यामध्ये मांजरा नदीकाठचे 13 तर तेरणा नदीकाठचे 17 गावाचा समावेश आहे. तेरणा नदीलाही मोठा पूर आला आहे. यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांचे पीकाचे नुकसान झाले आहे. ( Video: राम काळगे)
#heavyrainfall #rainfall #heavyrainfalllatur #manjarariver #latur #laturnewsupdates